धामणे, मस्कोनहट्टी, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळीत गणरायाला निरोप
वार्ताहर/धामणे
मंगळवार दि. 17 रोजी अंनत चतुर्थी दिवशी गेल्या अकरा दिवसापासून उत्साहाने सुरू असलेल्या गणेश उत्सवाची सांगता झाली. मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून धामणे मस्कोनहट्टी, सुळगा, देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी भागातील गणेशभक्तांनी घरातील गणपतींचे पूजन करून फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन केले. धामणे येथील घरगुतींचे विसर्जन गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकुडी तलावात व सार्वजनिक विहिरीत विसर्जन करण्यात आले. देसूर गावातील गणेशभक्तांनी जलोषी वातावरणात गावाशेजारील तलावात व मुंगेत्री नदीमध्ये गणपती बापाचे विसर्जण केले. नंदीहळळी, राजहंसगड येथील भाविकांनी गणपती गावाशेजारील तलावात विसर्जन केले. सुळगा (ये.) गावातील भक्तांनी सुळगा-देसूर रस्त्याशेजारील खंदकामधे गणपती बापा मोरया पुढच्यावर्षी लवकर... च्या अशा जयघोषात गणपती बाप्पांचे विसर्जन केले.