महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कसबा बीड परिसरात गावांमध्ये गणपती बाप्पाला निरोप! भक्तीपूर्ण वातावरणात गौरी गणपती विसर्जन

06:15 PM Sep 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ganapati Immersion
Advertisement

कसबा बीड/ वार्ताहर

गणेश चतुर्थी पासून अत्यंत उत्साहामध्ये ढोल ताशाच्या गजरात, लेझीम, झांज पथक, मर्दानी खेळ अशा विविध वाद्याच्या व सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग नोंदवत पाडळी खुर्द, कोगे, महे, कसबा बीड ,सावरवाडी,गणेशवाडी,शिरोली दुमाला ,हिरवडे दुमाला , सडोली दुमाला,सावर्डे दुमाला , चाफोडी आदी सर्व भागात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

Advertisement

कोगे येथे सलग 14 वर्षे गणेश मूर्ती दान प्रक्रिया ग्रामपंचायत व शिव शाहू विचार मंच यांच्या वतीने राबविण्यात आली. . त्यास सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नदी प्रदूषण टाळावे, नदीच्या पाण्यामध्ये घाण होऊ नये, सर्वांच्या आरोग्य चांगले राहावे या हेतूने चालू असलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.

Advertisement

पाडळी खुर्द, कोगे, महे, कसबा बीड ,सावरवाडी,गणेशवाडी,शिरोली दुमाला ,हिरवडे दुमाला , सडोली दुमाला,सावर्डे दुमाला , चाफोडी या गावामध्ये पर्यावरण पुरक विसर्जनाला प्राधान्य देण्यात आले.

Advertisement
Next Article