For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी भागात बाप्पाला भक्तिभावाने निरोप

10:24 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी भागात बाप्पाला भक्तिभावाने निरोप
Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

Advertisement

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, यमनापूर, शाहूनगर, वैभवनगर, परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. मंगळवारी सकाळपासून परिसरात घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत  होते. कंग्राळी खुर्द येथे मरगाईनगर सार्वजनिक विहीर गावाजवळील तलाव, किगदी तलाव, गौंडवाड, लक्ष्मी तलाव व भरमतलाव, यमनापूर, गौंडवाड भरम तलाव, शाहूनगर, वैभवनगर, किगदी आदी ठिकाणी घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन केल्याचे चित्र दिसून आले.

सार्वजनिक गणेशमूर्तींचे रात्री विसर्जन

Advertisement

कंग्राळी बुद्रुक येथे 10 ते 12, गौंडवाड एक, यमनापूर 2, वैभवनगर 3-4, शाहूनगर 2 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वस्तुंचा लिलाव करून ट्रॅक्टरमध्ये गणेशमूर्ती ठेवून 10 नंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मिरवणुकीमध्ये गणेशभक्त भक्तीगीतांच्या तालावर नृत्य करत असल्याचे दिसून येत होते.

Advertisement
Tags :

.