फरा प्रतिष्ठानचा उद्या वेंगुर्ल्यात दशावतार गुरुपौर्णिमा उत्सव
ज्येष्ठ दशावतारी कलावंतांची पाद्यपूजा व फरा पुरस्कारांचे वितरण
प्रतिनिधी
वेंगुर्ले
आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी कै. फटीराव रामचंद्र देसाई अर्थात फरा प्रतिष्ठाचा दशावतारी गुरुपौर्णिमा उत्सव यावर्षी वेंगुर्ले येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेला सकाळी ठिक १० वाजता कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात होणाऱ्या या गुरुपौर्णिमा उत्सवात फरा प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या फरा पुरस्कारांचेही वितरण होणार आहे.सकाळी ठिक १० वाजता गणपती पेटारा पूजन व गणपती आरती होणरा आहे. १०.२० वाजता कार्यक्रमाची प्रास्ताविका सादर करण्यात येईल. १०.३० वाजता प्रतिमा पूजन १०.३५ वाजता फरा पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता गुरुपौर्णिमा व दशावतार गुरुतुल्य व्यक्तिमत्वांचा संवाद, १२.४५ वाजता पुरस्कारार्थी व सन्माननीय व्यक्तिमत्वांची मनोगते, १ वाजता अध्यक्षीय मनोगत व त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.प्रसिद्ध दशावतारी कलावंत यशवंत तेंडोलकर, शिवराम उर्फ बाबी वेतोरकर, श्रीधर मुळीक, जयसिंग आलव, सुरेश धुरी आदींची पाद्यपूजा करण्यात येणार आहे. यावेळी आदर्श शिक्षक फरा पुरस्कार अरुण पवार (केंद्रशाळा कोलझर, ता. दोडामार्ग), अध्यापन भास्कर फरा पुरस्कार वैभव खानोलकर (उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, ता. वेंगुर्ले), आदर्श पत्रकारिता फरा पुरस्कार दिनेश केळुसकर (संपादक, दै हेरॉल्ड गोवा), स्नेहा विष्णू स्मृती नाट्य रंगकर्मी फरा पुरस्कार राधाकृष्ण उर्फ बाबली आकेरकर (मु आकेरी, ता. कुडाळ), सौ. हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार गायत्री गंगाराम निगुडकर (ओंकार प्रिंटिंग प्रेस, मळगाव ता. सावंतवाडी), आरोग्यसेवा फरा पुरस्कार डॉ. जि. एन. लाड (कलंबिस्त, ता. सावंतवाडी), स्मार्टग्राम फरा पुरस्कार ग्रामपंचायत कोचरा ता. वेंगुर्ला, (योगेश तेली), आदर्श कृषीरत्न फरा पुरस्कार संजय विठ्ठल गावडे (आंबेगाव, ता. सावंतवाडी) आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा फरा पुरस्कार संदेश बाबासाहेब देसाई (पत्रकार, पाल पुनर्वसन, ता. दोडामार्ग), संगीता श्यामसुंदर स्मृती आदर्श संगीत / भजनी सेवा फरा पुरस्कार सुधीर सावंत बुवा (सावंतवाडा, ता. दोडामार्ग), शैला स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा फरा पुरस्कार साक्षी नारायण परब ( धवडकी, माडखोल, ता. सावंतवाडी), आदर्श ग्रामसेवा फरा पुरस्कार मुकुंद परब, (ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय असनिये ता. सावंतवाडी), आदर्श अध्यात्म फरा पुरस्कार प्रशांत धोंड बुवा (माजी मुख्याध्यापक माणगाव हायस्कूल, पिंगुळी, ता. कुडाळ), आदर्श ग्रामरत्न फरा पुरस्कार कृष्णा उर्फ दादा सावंत (माजी उपसभापती, ता. सावंतवाडी), आदर्श भारतमाता सेवा पुरस्कार कर्नल विजयकुमार सावंत, (निगुडे ता. सावंतवाडी), आदर्श जीवनगौरव फरा भूषण पुरस्कार डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर (निवृत्त वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कॉटेज हॉस्पिटल सावंतवाडी) आदी सर्व व्यक्तींना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.दोडामार्ग तालुक्यात नावाजलेल्या फरा प्रतिष्ठानच्या या दशावतार गुरुपौर्णिमा व फरा पुरस्कार वितरण सोहळ्यास जिज्ञासू नागरिकांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे प्रतिपादन फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी केले आहे.