महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गिनीत फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये झटापट

10:57 PM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

100 हून अधिक जणांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ कोनाक्री

Advertisement

गिनीतील दुसरे सर्वात मोठे शहर एन जेरेकोरमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये झटापट झाली आहे. यात अनेक जण मारले गेले आहेत. रुग्णालयात मृतदेहांचा खच पडला असून अन्य लोक कॉरिडॉरमध्ये उपचाराची प्रतीक्षा करत असल्याचे एका डॉक्टरने सांगितले आहे. या घटनेत किमान 100 जण मृत्युमुखी पडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियवर प्रसारित व्हिडिओत सामन्याबाहेर रस्त्यावर अराजकतेचे दृश्य आणि जमिनीवर मोठ्या संख्येत मृतदेह असल्याचे दिसून येते.

तर या घटनेनंतर संतप्त लोकांनी एन जेरेकोर पोलीस स्थानकात तोडफोड करत आग लावली आहे. हा सर्व प्रकार रेफरीच्या वादग्रस्त निर्णयामुळे सुरू झाला. मग चाहत्यांनी मैदानातच धाव घेतली असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

हा सामना गिनीचे जुंटा नेते मामादी डौम्बौया यांच्या सन्मानार्थ आयोजित एका स्पर्धेचा हिस्सा होता. डौम्बौया यांनी 2021 मध्ये सत्तापालट घडवून आणत सत्ता स्वत:च्या हाती घेतली होती आणि स्वत:ला राष्ट्राध्यक्ष घोषित केले होते. डौम्बौया यांनी सप्टेंबर 2021 मध्ये अध्यक्ष अल्फा कोंडे यांना पदच्युत करत बळपूर्वक सत्तेवर नियंत्रण मिळविले होते. आंतरराष्ट्रीय दबावामुळे डौम्बौया यांनी 2024 च्या अखेरपर्यंत निवडून आलेल्या सरकारकडे सत्ता सोपविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता त्यांनी असे करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

डौम्बौया यांनी स्वत:च्या निर्णयाशी असहमत असलेल्या अनेक नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. तसेच अनेक नेत्यांना देश सोडण्यास भाग पाडले आहे. मोठ्या प्रमाणता नैसर्गिक संपदा असूनही गिनी हा अत्यंत गरीब देश आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article