तैवानच्या प्रसिद्ध मॉडेलचा ‘इंजेक्शन’मुळे मृत्यू
वृत्तसंस्था/ तैपेई
तैवानची प्रसिद्ध मॉडेल कै युक्सिनचा मृत्यू झाला आहे. 30 वर्षीय युक्सिन मागील काही काळापासून अनिद्रेने त्रस्त होती. अशास्थितीत तिने प्रख्यात डॉक्टर ‘लिपोसक्शनच्या गॉडफादर’कडून उपचार करविले होते. डॉक्टरने तिला ‘मिल्क इंजेक्शन’ टोचले होते, ज्यामुळे युक्सिनचा मृत्यू झाला आहे.
युक्सिनचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. ती मागील काही काळापासून अनिद्रेच्या समस्येने ग्रस्त होती. मागील महिन्यात तिच्या एका मित्राने तिला तैपेईच्या फेयरी क्लीनिकमध्ये उपचार करवून घेण्याचा सल्ला दिला होता. तेथेच मिल्क इंजेक्शन देण्यात आल्यावर युक्सिनचा मृत्यू झाला आहे.
क्लीनिकचे संचालक डॉक्टर वू शाओहू यांना ‘लिपोसक्शनचे गॉडफादर’ असेही म्हटले जाते. त्यांनीच युक्सिनला इंजेक्शन दिले होते, यानंतर ते त्वरित कक्षातून बाहेर पडले आणि मदतनीसाला युक्सिनकडे सोडले होते.
काय आहे मिल्क इंजेक्शन
मिल्क इंजेक्शनचे खरे नाव प्रोपोफोल असून ते एक अॅनेस्थेटिक इंजेक्शन आहे. याचा रंग पांढरा असल्यानेच याला मिल्क इंजेक्शन म्हटले जाते. युक्सिनला इंजेक्शन देण्यात आल्याच्या काही काळातच अॅनेस्थटिकचा मोठा डोस देण्यात आला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
कसा झाला युक्सिनचा मृत्यू?
शरीरार अॅनेस्थिकचे प्रमाण अधिक झाल्याने युक्सिनला हृदयविकाराचा धक्का बसला. यादरम्यान मदतनीसाने डॉक्टर शाओहूला व्हिडिओ कॉल केला असता त्यांनी सीपीआर देण्यास सांगितले आणि डॉक्टर त्वरित युक्सिनजवळ पोहोचले. यानंतर युक्सिनला 18 दिवसांपर्यंत कोमामध्ये ठेवण्यात आले. युक्सिनच्या प्रकृतीत gकठलीच सुधारणा न झाल्याने परिवाराने व्हेंटिलेटर हटविण्याची मागणी केली होती.