प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं निधन
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले आहे. कर्करोग झालेल्या राशिद खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
राशिद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर कोलकाता येथीलटाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना कोलकाता येथे हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १० जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राशिद खान यांनी वयाच्या 14 व्या वर्षी कोलकाताच्या आयटीसी संगीत रिसर्च अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. राशिद खान यांना 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारने गौरवण्यात आले होते.