संकटकाळात धाऊन जाणारा भाऊ हरपला !
सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यावसायिक सुरेश उर्फ भाऊ नाटेकर यांचे निधन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील मच्छी मार्केट परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक सुरेश उर्फ भाऊ नाटेकर( 69) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मच्छी मार्केट परिसरातील इमारतीत ते दुसऱ्या मजल्यावर राहत होते सावंतवाडीतील शिवगर्जना मंडळाची स्थापना करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी बी एन ट्रॅव्हल्स सुरू केली होती . मुंबई- गोवा मार्गावर त्यांच्या गाड्या धावत होत्या. भाऊ या नावानं ते सर्वत्र परिचित होते. त्याकाळी सावंतवाडीत त्यांचा दबदबा होता. गोरगरीब, संकटात असणाऱ्यासाठी धाऊन जाणारा भाऊ अशी त्यांची ओळख होती. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत असून येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पुतण्या , बहिणी असा परिवार आहे.