जून्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापूरात 2 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य कर्मचाऱ्यांचा सहकुटंब मोर्चा
राज्याभरात जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी आपल्या सहकुटुंबासह सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच तहसिलदार कार्यालयावर मोर्चे काढले. मात्र कोल्हापूरात शाळा आणि कॉलेजमध्ये सुरु असणार्या परिक्षा तसेच शिक्षक कर्मचार्यानां दिलेली निवडणूकीसंबंधित कामे यामुळे कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणारा मोर्चा पुढे ढकलण्यात येऊन २ डिसेंबरला सहकुटुंब प्रचंड इशारा मोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीने घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचटणिस तसेत कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक अनिल लवेकर यांनी दिली आहे.
राज्यभरात जून्या पेन्शनच्या मागणीसाठी ठरल्याप्रमाणे 7 डिसेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मोर्चे निघत आहेत. कोल्हापूरातही हा मोर्चा नियोजित होता. पण कोल्हापूरातील शाळा आणि कॉलेजमध्ये सुरु असणाऱ्या परिक्षा आणि जिल्ह्यातील निवडणूकांची कामे यामुळे कोल्हापूरातील समन्वय समितीने कोल्हापूरातील मोर्चा पुढे ढकलून 2 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
या अगोदर 20 मार्च 2023 रोजी राज्यभरात काढलेल्या संघटनेने मोर्चा काढला होता. त्यावेळ राज्य शासनाने सुकाणू समिती बरोबर चर्चा केली होती. तसेच राज्याच्या कर्मचाऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर संघटनेने संप मागे घेतला होता. त्यानंतर राज्याच्या सचिवांबरोबरही बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कोणताच ठोस शब्द देण्यात आला नव्हता. त्यामुळे संघटना अधिक आक्रमक होऊन आज राज्य भरात मोर्चे काढण्यात आले.
दरम्यान, शासनाने आंदोलकांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. उलट कर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. शैक्षणिक क्षेत्राचे खाजगीकरण होत आहे. त्यामुळे 17 लाख कुटुंबे सध्याच्या सरकारवर नाराज असून त्यामुऴे दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करा नाहीतर सरकार विरोधात प्रचंड आंदोलन उभा करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.