For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कौटुंबिक वादाचे रूपांतर हाणामारीत; मनपाडळ्यात तोडफोड अन् मारहाण

06:05 PM Jun 19, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कौटुंबिक वादाचे रूपांतर हाणामारीत  मनपाडळ्यात तोडफोड अन् मारहाण
Advertisement

अंबप : हातकणंगले तालुक्यातीलमनपाडळे येथे कौटुंबिक वादातून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाण व तोडफोडीमध्ये झाल्याने वडगाव पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

पहिल्या प्रकरणात, फिर्यादी आकाश धनाजी कुरणे (रा. मनपाडळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चुलतीच्या घरासमोर आरोपींनी शिवीगाळ करत घरात घुसून मारहाण केली तसेच घरातील भांडी, टिव्ही व सिमेंट पत्र्यांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या वडिलांना धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दुसऱ्या प्रकरणात, दीपक गोविंद कुरणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी निर्मला हिच्याबाबत विचारपूस करत असताना झालेल्या वादातून आरोपींनी दगडाने मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.