For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Murugud News | कागलमध्ये कौटुंबिक वादातून थरार! भावजईच्या विनयभंगाचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबावर कटरने खुनी हल्ला

01:29 PM Jun 01, 2026 IST | NEETA POTDAR
murugud news   कागलमध्ये कौटुंबिक वादातून थरार  भावजईच्या विनयभंगाचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबावर कटरने खुनी हल्ला
Advertisement

                     विनयभंगाचा जाब विचारायला गेलेल्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Advertisement

मुरगूड : सोनाळी (ता. कागल)येथील नात्याने भावजय असलेल्या मनिषा रणजीत माने (वय २७) यांचा दीर समाधान रघुनाथ माने (सोनाळी, ता. कागल) याने विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या पती, दोन दीर व चुलत सासू यांना लाकूड कापणीच्या कटरने व लोखंडी पाट्याने जखमी केल्या प्रकरणी मनोज रघूनाथ माने (रा. सोनाळी पैकी मानेवाडी, ता. कागल) या दोघांबर मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० मे रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास व सायंकाळी ६.३० वाजता ही घटना घडली आहे.याबाबत समाधान माने याच्याघरी सायंकाळी ६.३० वाजताजाब विचारण्यासाठी पती रणजीत जयसिंग माने, दीर युबराज माने,सतिश माने, सासू संगिता माने,जाऊ सौ. वर्षा युबराज माने व चुलत सासू शालन राजाराम माने हे गेले होते. त्यावेळी मनोज रघुनाथ माने याने लाकूड कापायच्या कटरने मनिषा रणजीतमाने यांचे पती रणजीत माने दीर युबराज माने, सतिश माने तसेच चुलत सासू शालन माने यांच्याबर हाताबर, कंबरेवर, छातीवर ब गालावर वार करून जखमी केले.

Advertisement

याप्रकरणी मनिषा रणजीतमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले करीत आहेत.

Advertisement
Tags :

.