महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोव्हॅक्सिनमुळे दुष्परिणामांचा दावा चुकीचा

06:51 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयसीएमआरने संबंधित अहवालावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कोरोना लसीवरून अलिकडेच अनेक नकारात्मक दावे करण्यात आले होते. आता या दाव्यांना आयसीएमआरने खोडून काढले आहे. कोव्हॅक्सिनच्या कथित दुष्परिणामांवर बनारस हिंदू विद्यापीठाच्या अध्ययनावर आयसीएमआरने आक्षेप घेतला आहे. संबंधित अध्ययन निकषांची पूर्तता करणारे नव्हते असे आयसीएमआरचे म्हणणे आहे. या अध्ययनाकरता आमची कुठलीच मदत घेण्यात आली नव्हती असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी या अध्ययनाचे लेखक आणि नियतकालिकाच्या संपादकाला एक पत्र लिहिले आहे. संबंधित अहवालातून आयसीएमआरचा नामोल्लेख हटविण्यास सांगण्यात आले असून याकरता एक खुलासा छापण्याची मागणी करण्यात आली आहे. अध्ययनाच्या खराब कार्यप्रणाली आणि डिझाइनवर देखील आयसीएमआरने प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोव्हॅक्सिन टोचून घेणारे बहुतांश लोक श्वसनसंबंधी संक्रमण, रक्ताच्या गुठळ्या आणि त्वचेशी निगडित आजारांनी प्रभावित झालहे. विशेषकरून किशोरवयीन मुली आणि एखाद्या अॅलर्जीने पीडित लोकांना कोव्हॅक्सिनच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागल्याचा दावा बीएचयूच्या अध्ययन अहवालात करण्यात आला होता. तर कोव्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण भारत बायोटेक या कंपनीने दिले होते.

कोव्हॅक्सिन टोचून घेणाऱ्या सुमारे 5 टक्के किशोरवयीन मुलींना दुष्परिणामांना सामोरे जावे लागले आहे. 2.7 टक्के लोकांमध्ये डोळ्यांशी निगडित समस्या आणि 0.6 टक्के जणांमध्ये हाइपोथायरायडिजमची समस्या झाली. 0.3 टक्के लोकांमध्ये स्ट्रोक आणि 0.1 जणांना गुलियन बेरी सिंड्रोमला तोंड द्यावे लागल्याचा दावा बीएचयूच्या अहवालात करण्यात आला होता. हा अध्ययन अहवाल प्रतिष्ठित नियतकालिक स्प्रिंगर लिंकमध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article