झाड कोसळल्याने वाहतुकीत व्यत्यय
11:49 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : रस्त्याशेजारील झाड कोसळून काही काळ वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीनगर परिसरात ही घटना घडली असून सुदैवाने या घटनेत कोणालाच इजा पोहोचली नाही.श्रीनगरहून माळमारुती पोलीस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. झाड कोसळले त्यावेळी या मार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती. मात्र सुदैवाने अप्रिय घटना घडली नाही. काही काळ वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला होता.
Advertisement
Advertisement