महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पावसाने विविध ठिकाणी झाडांची पडझड

11:35 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहनधारकांना धोका, मालमत्तांचे नुकसान

Advertisement

बेळगाव : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घरे, झाडे, वीजखांबांची पडझड सुरू झाली आहे. गुरुवारी गणेशपूर ते बिजगर्णी मार्गावर 7 झाडे कोसळली आहेत. त्याचबरोबर इतरत्र झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. झाडांच्या पडझडीमुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे कमकुवत आणि धोकादायक झाडांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी आतातरी वनखाते जागे होणार का? हे पहावे लागणार आहे.

Advertisement

पावसाबरोबर वाऱ्याचा जोरही अधिक आहे. त्यामुळे जीर्ण आणि कमकुवत झाडे कोसळू लागली आहेत. परिणामी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण होऊ लागला आहे. पावसाळ्यापूर्वीच वनखात्याने धोकादायक झाडे हटविणे आवश्यक होते. मात्र वनखात्याचे याकडे दुर्लक्ष झाल्याने झाडांची पडझड वाढली आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे घरे, शासकीय कार्यालय आणि इतर खासगी मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी एका बाजूला कलंडलेल्या फांद्याही कोसळू लागल्या आहेत.

झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित 

वादळी पावसाने झाडे कोसळून विविध ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. अनेक रस्त्यांवर झाडे विद्युततारा आणि खांबांवर कोसळली आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. परिणामी दैनंदिन व्यवहारात समस्या निर्माण होताना दिसत आहेत.

कॅम्प परिसरात कोसळले झाड 

कॅम्प येथील कॉर्नरवर झाड कोसळून दुचाकीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वीजवाहिन्या तुटल्याने काहीकाळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. सुदैवाने या ठिकाणी कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र झाडांची पडझड वाढल्याने धोकादायक झाडांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धोकादायक झाडांच्या खाली किंवा झाडांच्याशेजारी कोणी थांबू नये, असे आवाहन वनखात्याने केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article