महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअर बाजाराच्या विशेष सत्रात घसरण

06:17 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोमवारी बाजार राहणार बंद : सेन्सेक्स 260 तर निफ्टी 50 अंकांनी घसरणीत

Advertisement

मुंबई :

Advertisement

शनिवारी भारतीय शेअरबाजाराचे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सत्रात सेन्सेक्स, निफ्टी दोन्हीही घसरणीसह बंद झाले होते. गुंतवणूकदारांची पूर्ती निराशा झाल्याचे दिसून आले. एफएमसीजी आणि आयटी यांच्या समभागांमधील विक्रीच्या कारणास्तव सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

मुख्य कंपन्यांच्या कामगिरीच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 259.58 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 71,423.65 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 50.60 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 21,571.80 वर बंद झाला. सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये फक्त कोटक बँक, पॉवरग्रिड कॉर्प, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांचे निर्देशांक तेजीत राहिले. तर अन्य कंपन्यांपैकी हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.72 टक्क्यांनी घसरणीत राहिले. यासह टीसीएस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, एचसीएल टेक यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातील घसरणीमुळे बाजारात नकारात्मक कल राहिला होता.

बाजार सोमवारी बंद

अयोध्येमधील राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सोमवार 22 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे.

 

.................................

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article