महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रामप्रमुखाच्या पुत्राचे बनावट मतदान

06:44 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर प्रदेश राज्याच्या फारुखाबाद लोकसभा मतदारसंघात एका ग्रामप्रमुखाच्या अल्पवयीन पुत्राने बनावट मतदान केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे या दिवशी मतदान झाले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या संबंधातील व्हीडीओ प्रसिद्ध केला आहे. हा मुलगा या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासमोर मतदान यंत्राचे बटण सात आठ वेळा दाबत आहे, असे व्हिडीओत दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

हा प्रकार ज्या मतदान केंद्रावर घडला, तेथे पुनर्मतदान करण्याचा आदेश द्यावा, असे केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविण्यात आल्याचे उत्तर प्रदेशच्या निवडणूक अधिकाऱ्याने प्रतिपादन केले आहे. या मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार नवल किशोर शाक्य यांनी या संबंधात तक्रार सादर केली असून चौकशी केली जात आहे. या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या मुलानेच हा व्हिडीओ काढला असाही आरोप केला जात आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत गुन्हा सादर करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. या मतदान केंद्रावरील सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article