For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीचे बनावट वेळापत्रक व्हायरल

06:10 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा निवडणुकीचे  बनावट वेळापत्रक व्हायरल
Advertisement

निवडणक आयोगाचे ‘फेक’ असल्याचे स्पष्टीकरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात लोकसभा निवडणुका फार दूर नाहीत. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनीती आखण्यात व्यग्र असतानाच इंटरनेट आणि व्हॉट्सअॅपवर 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक व्हायरल होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान होतील असा उल्लेख त्यात दिसून येत आहे. परंतु निवडणूक आयोगानेच या व्हायरल वेळापत्रकाचे खंडन करत निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ‘आम्ही सोशल मीडियाद्वारे मतदान कार्यक्रम जाहीर न करता जाहीर पत्रकार परिषद घेऊन रितसर निवडणुकांची घोषणा करतो’ असे आयोगाने म्हटले आहे. एकंदर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा असलेली पोस्ट बनावट असल्याचे तथ्य तपासणीत समोर आले आहे.

Advertisement

केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तरीही गेल्या काही दिवसात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लोकसभा निवडणूक कार्यक्रमाविषयी एक पोस्ट व्हायरल होत आहे. सदर शेअर केलेल्या वेळापत्रकात 18 व्या लोकसभा निवडणुकीची 2024 तारीख आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात होतील असे त्यात लिहिले आहे. पुढे सर्व 7 टप्प्यांच्या तारखादेखील दिल्या आहेत. यामध्ये पहिला टप्पा 11 एप्रिलला, दुसरा टप्पा 18 एप्रिलला, तिसरा टप्पा 23 एप्रिलला, चौथा टप्पा 29 एप्रिलला, पाचवा टप्पा 6 मे रोजी, सहावा टप्पा 12 मे रोजी आणि सातव्या टप्प्यातील निवडणुका 19 मे रोजी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने या व्हायरल मेसेजचे खंडन करत देशवासियांचे शंकानिरसन केले आहे.

Advertisement
Tags :

.