For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलेचा मंत्र्यांसोबत विवाह झाल्याचा दावा करणारे बनावट पोस्टर व्हायरल; वास्को पोलिसांत गुन्हा

11:26 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिलेचा मंत्र्यांसोबत विवाह झाल्याचा दावा करणारे बनावट पोस्टर व्हायरल  वास्को पोलिसांत गुन्हा
Advertisement

वास्को : राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्यांसोबत महिलेचा कायदेशीर विवाह झाल्याचा दावा करणारे कथित बनावट इलेक्ट्रॉनिक पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी संबंधित महिलेचा आणि मंत्र्यांचा फोटो वापरून हे पोस्टर तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या पोस्टरमध्ये दोघांचा कायदेशीर विवाह झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हे पोस्टर सोशल मीडियावर खरे असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या कथित बनावट मजकुरामुळे महिलेची प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन करण्याचा उद्देश असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

Advertisement

या प्रकरणी वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, बनावट पोस्टर कोणी तयार केले आणि ते सोशल मीडियावर कोणी प्रसारित केले, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.