महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली विमानतळावर बनावट पायलटला अटक

06:34 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) शुक्रवारी दिल्ली विमानतळावर एका बनावट पायलटला अटक केली. पायलटचा गणवेश घालून विमानतळावर फिरत असतानाच ही कारवाई करण्यात आली. सीआयएसएफने आरोपीला पकडून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. पायलटच्या गणवेशातील एक व्यक्ती विमानतळाच्या स्कायवॉकजवळून जाताना दिसला. सीआयएसएफला या व्यक्तीवर संशय आल्यानंतर त्याची चौकशी केली असता तो पायलट नसल्याचे निष्पन्न झाले. सीआयएसएफने या प्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Advertisement

सदर बनावट पायलट सिंगापूर एअरलाईन्सचा पायलट म्हणून वावरत होता. त्याच्या गळ्यात ओळखपत्रही लटकले होते. 24 वषीय संगीत सिंग असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर येथील रहिवासी आहे. बिझनेस कार्ड मेकर अॅपचा वापर करून त्याने सिंगापूर एअरलाईन्सच्या पायलटचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. पायलटचा गणवेश त्याने द्वारका परिसरातून खरेदी केला होता. त्याने 2020 मध्ये मुंबईतून 1 वर्षाचा एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी कोर्स केला. आपण वैमानिक असल्याचेही तो आपल्या कुटुंबियांशी खोटे बोलत राहिला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article