For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश

11:52 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश
Advertisement

गोकाक पोलिसांकडून सहा जणांच्या टोळीला अटक : अंदाजे 5,23,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

बेळगाव : बनावट नोटा तयार करून डबल करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा गोकाक पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक करून त्यांच्याकडील बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे. अन्वर महमद सलीम यादवाड (वय 26, रा. अरभावी), सद्दाम मुसा यडहळ्ळी (वय 27, रा. महालिंगपूर), रवि चन्नाप्पा हॅगाडी (वय 27, रा. महालिंगपूर), दुंडाप्पा महादेव वनशनवी (वय 27, रा. महालिंगपूर), विठ्ठल हणमंत व्हसकोटी (वय 29, रा. महालिंगपूर, बुदनी पी.डी.), मल्लाप्पा अल्लाप्पा कुंबाळी (वय 29, रा. महालिंगपूर, ता. रबकवी बनहट्टी, जि. बागलकोट) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

वाहनाच्या तपासणीनंतर आढळल्या बनावट नोटा

Advertisement

गोकाक कबडगट्टी रस्त्यावरून बेळगावकडे खोट्या नोटा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून 100 रुपयाच्या 305 (30,500 रु.) बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच 500 रुपये प्रमाणे दिसणाऱ्या नोटांचे बंडल त्यावर 500 रुपयांच्या नोटा लावण्यात आल्या होत्या. या बंडलांसह वाहन घेऊन जाणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक करून तपास हाती घेतला होता. प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली. संशयितांकडून खोट्या नोटा प्रिंट करून त्या चलनात आणल्या जात होत्या.

पैसे डबल करून देण्याचे सांगून गोकाक, महालिंगपूर, मुधोळ, यरगट्टी, हिडकल डॅम, बेळगाव, धारवाड, आदी ठिकाणी 1 लाख रुपयांच्या खऱ्या नोटासाठी 4 लाख रुपये खोट्या नोटा देऊन नागरिकांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमधील अन्वर यादवाड (रा. अरभावी) याच्या घरातून खोट्या नोटा प्रिंट करण्यासाठी वापरत असलेले संगणक, सीपीयु, प्रिंटर, स्कॅनिंग बोर्ड, पेंट, शायनिंग स्पिकर, डिकोटींग पावडर, प्रिंटिंग पेपर, कटर ब्लेड, सहा मोबाईल, एक कार, अशा प्रकारे एकूण अंदाजे 5,23,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद,गोकाक सीपीआय गोपाल राठोड यांच्या नेतृत्वामध्ये पथक नेमणूक करून या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डीएसपी गोकाक यांच्या मार्गदर्शनाखाली नेमणूक केलेल्या तपास पथकामध्ये गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण मोहिते, गोकाक शहर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. वालीकर, अंकलगी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, पोलीस कर्मचारी बी. व्ही. नेर्ली, डी. जी. कोन्नूर, सुरेश इरगार, मारुती हल्लोळ्ळी, व्ही. आर. नायक, शिवानंद कस्तुरी, जगदीश गुडली, विठ्ठल नाईकवाडी, मारुती पडदली, कुमार पवार, मंजुनाथ तळवार, दुंडेश अंतरगट्टी, अडव्याप्पा कापशी, तसेच तांत्रिक विभागाचे सचिन पाटील, विनोद ठक्कन्नावर यांचा सहभाग होता. या यशस्वी कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.