विविध टूल्सवरुन ग्राहकांना बनावट मॅसेज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय लोकांना ईमेल, व्हॉट्सअॅप, मोबाईल इनबॉक्स किंवा सोशल मीडियावर दररोज सरासरी 12 बनावट मेसेज येत आहेत. यामुळे भारतीय दर आठवड्याला सरासरी 2 तास वेळ वाया घालवतात. लोकांना मिळालेल्या या फसवणुकीच्या संदेशांपैकी सर्वात सामान्य म्हणजे 64 टक्के बनावट नोकरीच्या ऑफर किंवा सूचना आणि 52 टक्के बँकांकडून बनावट संदेश येन असल्याची माहिती आहे. संशोधनात सहभागी असलेल्या 60 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की ते खरे आणि खोटे संदेश यात फरक करू शकत नाहीत.
यातील 90 टक्के लोकांना ईमेलद्वारे बनावट मॅसेच येतात. तर यातील 84 टक्के मेसेज सोशल मीडियावरून प्राप्त होतात. यापैकी 82 टक्के लोक जे कधी ना कधी या बनावट संदेशांना बळी पडले आहेत.
मॅक-ए-फीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष रोमा मजुमदार यांच्या मते, एआयद्वारे बनावट संदेश देखील तयार केले जात आहेत. बहुतेक भारतीय यामुळे त्रस्त असल्याचेही त्यांनी म्हटले.