कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Khed News: हवेत गोळीबाराचा बनाव, पोलिसांना दिली खोटी माहिती, तरुणावर गुन्हा दाखल

11:08 AM May 26, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

कारवर दगडफेक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले

Advertisement

खेड : खेड-खोपी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात तरुणांनी हवेत गोळीबार केल्याचा बनाव अखेर उघड झाला आहे. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी प्रणित प्रमोद साळवी (21, रा. मिर्ले-खेड) याच्यावर रविवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, कारवर दगडफेक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कारही पोलिसांनी तात्पुरती ताब्यात घेतली आहे. तालुक्यातील मिर्ले येथील केतन साळवी हे सेलिरिओ कारने (एमएच 08 एएक्स 4613) खेड येथून खोपीच्या दिशेने जात असताना चार अज्ञात तरुणांनी हवेत गोळीबार करत कारवर दगडफेक केल्याचा कॉल कारचालकाचा भाऊ प्रणित साळवी याने पोलिसांना 112 क्रमांकावर केला होता.

हवेत गोळीबार करत भावावर जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिसांना कळवले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले व अन्य सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला होता. हवेत गोळीबार झाल्याबाबत संशयास्पद असे काहीच पोलिसांना आढळले नव्हते.

शिवाय, खोपी फाट्यानजीकच्या रहिवासी आणि नजीकचे दुकानदार यांच्याकडेही पोलिसांनी विचारणा केली असता हवेतील गोळीबाराचा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तक्रारदार प्रणित साळवी याची रविवारी कसून चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. यानंतरच हवेत गोळीबाराचा बनाव अखेर पोलिसांनी उघड केला.

दगडफेकप्रकरणी तपास सुरूच

चौकशीदरम्यान, तक्रारदाराने खोपीफाट्यानजीक एका एसटी बसलाही धडक बसून कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी येथील एसटी प्रशासनाशी संपर्क साधला असता असा कुठलाही अपघात घडला नसल्याचे स्पष्ट केले.

हवेतील गोळीबार हा निव्वळ कांगावा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र कारवर केवळ दगडफेक झाली असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलेली कारही पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#crime news#khed_news#kokan#Police action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakokan news
Next Article