For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकाक तालुक्यात बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड

06:13 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोकाक तालुक्यात बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बनावट नोटा तयार करणाऱ्या एका टोळीचा गोकाक पोलिसांनी छडा लावला आहे. या टोळीतील सुमारे आठ जणांना गोकाक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात येत होती. अरभावी परिसरात बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्यात येत होत्या. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी एका टोळीचा छडा लावला असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यासंबंधी गोकाक पोलिसांशी संपर्क साधला असता संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.