ज्योतिषी असल्याचा बहाणा करत महिलेचे 65 हजारांचे दागिने लंपास
गडहिंग्लजच्या मारुती मंदिरातील घटना
गडहिंग्लज
ज्योतिषी असल्याचा बहाणा करत तुमचे चांगले होईल, असे सांगत शहरातील मारूती मंदिरातील पूजारी विजया चंद्रकांत गुरव या महिलेच्या गळयातील चेन आणि हातातील अंगठी घेऊन अज्ञाताने 65 हजाराचे सोने लंपास केले आहे. रविवारी सकाळी 7 वाजता सदर घटना घडली. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील नेहरू चौकात असणाऱ्या मारूती मंदिरात एका व्यक्तीने मी ज्योतिषी आहे. मला देवाला दक्षिणा द्यायची सांगत दक्षिणा कुठे ठेवून असे विचारले. त्यावेळी पुजारी महिलेने टेबलावर ठेवण्यास सांगितले. त्यावेळी त्या ज्योतिषाने तुमचे चांगले होईल असे सांगत तेथील पुजारी महिलेला गळयातील 9.9 ग्रॅमची सोन्याची चेन, गोफ असलेली तीस सोन्याचे पेडॉल आणि हातातील सोन्याची अंगठी टेबलावर ठेवण्यास सांगितले. ती चेन आणि अंगठी त्याने ठेवलेल्या पैशात गुंडाळून कॅरीबॅगेत ठेवत महिलेच्या हातात दिले. आणि ही कॅरीबॅग घरी गेल्यावर उघडा असे सांगत हात चलाखीने दुसरी बॅग हातात देत घरी जाण्यास सांगितले. पूजारी महिलेने घरी गेल्यावर कॅरीबॅगेत पाहिले असता पैसे आणि सोने गायब झाल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी बिस्कीटचे 2 पूढे आढळले. चोरटयाने हात चालखीने 65 हजारांचे सोने लंपास केल्याचे दिसून आल्यावर त्यांना धक्का बसला. पोलिसात धाव घेत विजया चंद्रकांत गुरव (वय 58) यांनी फिर्याद दिली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार भारती करडे करत आहेत.