परुळे येथील देवी वराठीचा जत्रोत्सव 20 डिसेंबरला
03:10 PM Dec 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
परूळे/प्रतिनिधी
Advertisement
परूळे येथील श्री देवी वराठीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची पुजा अर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement