For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माविनकट्टी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ

11:53 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
माविनकट्टी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ
Advertisement

रथोत्सवानंतर आज गदगेवर होणार देवी विराजमान

Advertisement

सांबरा : माविनकट्टी ता. बेळगाव येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवार दि. 7 एप्रिल रोजी श्री महालक्ष्मी देवीच्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला. नऊ दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 7 रोजी धार्मिक विधी झाल्यानंतर अक्षतारोपण करण्यात आले. अक्षतारोपणसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीची स्थापना करण्यात येणार आली. तर सकाळी 9 वाजता श्री तपोभूषण श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ कटकोळ एम चंदरगी व प. पू. रुद्रमुनी स्वामीजी हिरेमठ माविनकट्टी यांच्या दिव्य सानिध्यात श्री महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली. यावेळी देवस्थान कमिटी, इनामदार व हक्कदारांच्या वतीने देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी रथामध्ये विराजमान झाल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. भंडाऱ्याची उधळण करत व श्री महालक्ष्मी देवीचा जयजयकार करत रथोत्सवामध्ये हजारो भाविकांनी भाग घेतला होता. त्यामुळे सर्व परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

मनोरंजन कार्यक्रम, पाळणे, खेळण्यांची दुकाने-स्टॉल्स

Advertisement

बुधवार दि. 8 रोजी सकाळी आठ वाजता रथोत्सवाला प्रारंभ होईल व सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध सांस्कृतिक व मनोरंजनाच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहर बसस्थानक (सीबीटी) येथून माविनकट्टी गावासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. तर मुलांच्यासाठी पाळणे व खेळण्यांची दुकाने व इतर स्टॉल्स मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आले आहेत. 17 वर्षानंतर होत असलेल्या यात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.