मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा बिघाड
तक्रारीनंतर कंपनीचा माफीनामा 11 दिवसांपूर्वी जगभरातील सेवा झाली होती खंडित
वॉशिंग्टन :
जगभरातील मायक्रोसॉफ्ट उत्पादने वापरणाऱ्या हजारो लोकांना 30 जुलै रोजी पुन्हा एकदा आणखी एका आउटेजचा सामना करावा लागला. यामध्ये ई-मेल सेवा आउटलूकपासून प्रसिद्ध गेम मिन्सेकार्फ्ट सेवांचा समावेश आहे. अशाच सेवांमध्ये 11 दिवसांपूर्वी या कंपनीच्या सेवा जगभरात बंद करण्यात आल्या होत्या. वेबसाइट्सचे निरीक्षण करणाऱ्या डाऊन डिटेक्टरने सांगितले की, मंगळवारी दुपारपर्यंत हजारो लोकांनी समस्या नोंदवल्या होत्या. यानंतर कंपनीला माफी मागावी लागली.
कंपनीने सांगितले की, संबंधीत बिघाड झाल्याच्या गोष्टींचा तज्ञ तपास करत आहेत. मायक्रोसॉफ्टने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट केले आणि सांगितले की ‘आम्ही जागतिक स्तरावर मायक्रोसॉफ्ट सेवांशी संबंधित समस्यांच्या अहवालांची तपासणी करत आहोत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमचे तज्ञ यासंबंधी अधिक तपास करत आहेत. ज्या समस्या आहेत त्या जेणेकरून लवकरात लवकर सोडवता येतील.’
वर्ड आणि एक्सेल सारख्या अॅप्लिकेशन्समध्येही ही समस्या आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने सांगितले की काही ऑफिस अॅप्लिकेशन्स आणि सेवांमध्ये व्यत्यय अनुभवत आहेत. समस्या अनेक मायक्रोसॉफ्ट 365 सेवांवर परिणाम करत आहे.