कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये 'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' सुरू

04:13 PM Dec 29, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उद्घाटन काल करण्यात आले. 'न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे निर्माण होणाऱ्या संधी व आव्हाने' हा या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य विषय आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य प्रा.गजानन भोसले, संयोजक प्रा. दीपक पाटील व समन्वयक प्रा.प्रसाद सावंत उपस्थित होते. 'इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली' यांनी हा प्रशिक्षण वर्ग पुरस्कृत केला असून यामध्ये विविध तंत्रनिकेतन संस्थांचे 100 पेक्षा जास्त शिक्षक सहभागी झाले आहेत. 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संचिता कोलपाते यांनी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# Bhonsale Institute of Technology# sawantwadi # tarun bharat news#
Next Article