फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमची सुरुवात
आयएमईआरतर्फे आयोजन : मान्यवरांचा सहभाग
बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च (केएलएस आयएमईआर), राणी चन्नम्मा विद्यापीठ, एआयसीटीई अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (एफडीपी) चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी झाले. प्रारंभी आयएमईआरचे समन्वयक डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी स्वागत केले. संचालक प्रा. डॉ. आरिफ शेख यांनी प्रोग्रॅम आयोजनाचा उद्देश सांगितला. प्रमुख पाहुणे कृषीकल्प फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. पाटील यांनी विचार व्यक्त केले. कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी कौशल्य कसे वापरावे? यावर त्यांनी माहिती दिली. कृषी क्षेत्रासाठी अॅग्रिटेकची भूमिका व कौशल्य यावरही त्यांनी सखोल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात आर. एस. मुतालिक यांनी शिक्षणातील नाविन्यता आणि शाश्वतता वाढविण्यासाठी संस्था वचनबद्ध असल्याचे सांगितले. सहयोगी प्रा. डॉ. अजय जमनानी यांनी आभार मानले. उद्घाटन कार्यक्रमाला आयएमईआरचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम 7 डिसेंबरपर्यंत चालेल, अशी माहिती देण्यात आली