महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मागील हिशोब न देता कारखाने चालू ठेवले तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

06:22 PM Nov 02, 2023 IST | Abhijeet Khandekar
Raju Shetty
Advertisement

आम्ही जे मागतोय ते हिशोबाने मागतोय... मागील हिशोब पुरा न ठेवता कारखानदार कारखाना चालु ठेवणार असतील तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. या बैठकीला कारखानदारांनी उशीर केल्याने साखर कारखाने वेळेत सुरु होत नाहीत. त्यामुळे हिशेब पुर्ण करा आणि कारखाने चालु करा असे आवाहनही राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु झाला आहे. पण ऊस दराच्या तोडग्याअभावी अपवाद वगळता सर्व कारखाने बंदच आहेत. साखरेसह अन्य उपपदार्थांना गेल्या वर्षभरात चांगला भाव मिळाल्यामुळे गत वर्षात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 रूपयेंचा हप्ता आणि चालू गाळप हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान 3500 रूपये विनाकपात पहिला हप्ता देण्याची सर्वच शेतकरी संघटनांची मागणी आहे. पण कारखानदारांना ही मागणी मान्य नसल्यामुळे संघटना आणि कारखानदारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बैठक आयोजित केली आहे.

Advertisement

या बैठकिनंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, "आमची मागणी रास्त आहे. आम्ही 400 रूपये हिशोबाने मागतोय. बी हेवी मॉलेसिसपासून इथेनॉल तयार होते असल्याने साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी होते. त्याचा फटका उस उत्पादकांचा होऊन तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून निघले पाहीजे." अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

पुढे कारखानदारांवर आरोप करताना ते म्हणाले, "या बैठकीला साखर कारखानदारांनी उशीर केला आहे. त्यामुळे वेऴेत कारखाने सुरु होत नाहीत ही जबाबदारी त्यांची आहे. हिशेब पुर्ण करा आणि कारखाने चालु करा अशीच आमची मागणी आहे. मागिल हिशोब पुर्ण न करता कारखानदार कारखाना चालु ठेवणार असतील तर मात्र संघर्ष अटळ आहे." असेही ते म्हणाले.

शेवटी आरोप करताना ते म्हणाले, "हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांच्याबरोबर आमचं अनौपचारीक बोलणेझालं. मागील हिशोब कशा पद्धतीने देण्यात येईल याची चर्चा करा असा प्रस्ताव त्यांनी दिला त्यामुळे आज बैठकिला हजर राहीलो. बाजार भावापेक्षा कमी भावाने साखर विकण्यामागे एकतर कारखानदारांच्या ट्रेडिंग कंपनीला साखर विकल्याने किंवा वरून पैसे घेतल्याने कमी दरात लावली गेली आहे. त्यामुळे शेवटी हे शेतकऱ्यांचेच नुकसान आहे. आम्ही कारखानदारांच्या प्रतिनिधींना हे नुकसान तुम्हाला भरून द्यावेच लागेल असे सांगितले आहे." असे राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

Advertisement
Tags :
collecter rahul rekhawarmeetingRaju Shettytarun bharat news
Next Article