महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा केंद्राची सोय

10:44 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परवानगीसाठी 48 तास आधी अर्ज करणे गरजेचे

Advertisement

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांना सभा, बैठक घेण्यासाठी सुविधा अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सदर केंद्र सुरू करण्यात आले आहे. राजकीय पक्षांना राजकीय मेळावे, सभा घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेणे सक्तीचे आहे. यासाठी 48 तास आधी सुविधा वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. सदर अर्ज पाहून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे निकालात काढून परवानगी दिली जाणार आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार करणे, पत्रके वाटणे, घरोघरी जाऊन प्रचार करणे, कार्यकर्त्यांच्या बैठका बोलविणे, जाहीरसभा घेणे, विशेष नेत्यांच्या सभांचे आयोजन करणे आदींसाठी परवानगी घेणे सक्तीचे आहे. त्यामुळे अशा राजकीय कार्यक्रमांसाठी सुविधा वेबसाईटवरून अर्ज करावा लागतो. संबंधित अर्जांची साहाय्यक निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून छाननी करून परवानगी देण्याची सोय केली आहे. कार्यक्रमांच्या अनुषंगाने निवडणूक अधिकाऱ्यांना परवानगीचे अधिकार देण्यात आले आहेत. अर्जांची वर्गवारी करून निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article