For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रायगड येथे नित्यपूजेसाठी धारकऱ्यांची सोय करा

10:35 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
रायगड येथे नित्यपूजेसाठी धारकऱ्यांची सोय करा
Advertisement

शिवप्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांची महाड तहसीलदारांकडे मागणी

Advertisement

बेळगाव : स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर पूजेसाठी जाणाऱ्या धारकऱ्यांना गडावर राहण्यास बंदी घालण्यात आली होती. यामुळे धारकऱ्यांची गैरसोय होत होती. या गैरसोयीबाबत शिवप्रतिष्ठानच्या प्रमुख पदाधिकऱ्यांनी महाडच्या तहसीलदारांना निवेदन देऊन कायमस्वरुपी एक खोली देण्याची विनंती केली होती. याला तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. किल्ले रायगडावर दररोज हजारो शिवभक्त भेट देतात. नित्य पूजेसाठी अनेक धारकरी गडावर जातात. परंतु मध्यंतरी रायगडावर शिवभक्तांना राहण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे पूजेला जाणाऱ्या धारकऱ्यांवरही निर्बंध आले. प्रत्येक दिवशी गड चढून दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उतरण्याची कसरत धारकऱ्यांना करावी लागत होती. त्यामुळे रायगडावर कायमस्वरुपी राहण्यासाठी खोली उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या सांगण्यावरून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महाडचे तहसीलदार शितोळे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे धारकऱ्यांची नित्य पूजेसाठी सोय होणार आहे. यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, सांगली येथील मिलिंद तानवडे, हणमंत पवार, राजू पुजारी, जोतिबा गडकरी यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.