सिग्नीचर एफसीकडे फॅबलीग चषक
बेळगाव : सेलिब्रेशन इव्हेंटतर्फे घेण्यात आलेल्या फॅबलीग सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिग्नीचर एफसी संघाने रॉ फिटनेस संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करुन फॅबलीग चषक पटकाविला. किरण निकम उकृष्ट खेळाडू तर पार्थ अष्टेकर उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. वडगाव येथील सीआय सेव्हन टर्फ फुटबॉल मैदानावर घेण्यात आलेल्या या अंतिम सामना सिग्नीचर एफसी व रॉ फिटनेस संघात झाला. सामन्याच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे उद्योजक प्रणय शेट्टी, अॅड. अनुराधा पाटील, गजानन जैनोजी, नौशाद जमादार, जुबेर चौधरी व प्रशांत मुन्नोळी आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करुन करण्यात आले.
अंतिम सामन्यात 17 व्या मिनिटाला डी. एम. हर्षलने गोल करुन 1-0 ची आघाडी संघाला मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात रॉ फिटनेसच्या सुफियान सय्यदने मैदानी गोल करुन 1-1 अशी बरोबरी करत सामन्यात रंगत निर्माण केली.निर्धारित वेळेत दोन्ही संघाचे गोलफलक बरोबरीत राहिल्याने पंचांनी टायब्रेक नियमाचा वापर केला. त्यामध्ये सिग्नीचर संघाने 3-2 अशा गोल फरकाने करुन विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर प्रमुख पाहुण प्रणय शेट्टी, अॅड. अनुराधा पाटील, गजानन जैनोजी, नौशाद जमादार, जुबेर चौधरी व प्रशांत मुन्नोळी यांच्या हस्ते विजेते सिग्नीचर संघाला व उपविजेत्या रॉ फिटनेश एफसी संघाला चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उकृष्ट खेळाडू किरण निकम-सिग्नीचर एफसी, उत्कृष्ट गोलरक्षक पार्थ अष्टेकर-सिग्नीचर, उत्कृष्ट मिडफिल्डर अनस मुल्ला-रॉ फिटनेस, बेस्ट फारवर्ड सुफियान सय्यद-रॉ फिटनेस व माविया उस्ताद-भारत एफसी यांना विभागून तर स्पर्धेतील उगवता खेळाडू वेदांत चौगुले-रेग एफसी यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा आयोजक विजय रेडेकर, ओमकार कुंडेकर, शुभम यादव, साहील मांगले, प्रदीप राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.