For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फॅब साखळी फुटबॉल स्पर्धा जूनमध्ये

10:08 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
फॅब साखळी फुटबॉल स्पर्धा जूनमध्ये
Advertisement

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब चषक सेव्हन ए साईड साखळी फुटबॉल स्पर्धा 31 जूनपासून साईराज लॉन्स मैदानावरती होणार आहे. या स्पर्धेसाठी 8 संघांना निमंत्रित करण्यात आले असून बेळगावातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. साईराज लॉन्स येथे झालेल्या बैठकीत बेळगावतील 140 नोंदणी फुटबॉलपटूंनी या स्पर्धेसाठी सहभाग दर्शवला होता. त्यामधून 80 खेळाडूंची निवड करण्यात आली असून 8 संघांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत के.आर. शेट्टी किंग्स, ग्रो स्पोर्ट्स एफसी, भरत एफसी, फॅट्स एफसी, टेनटेन एफसी, राहुलस् के.आर. शेट्टी, डिसाईडर एफसी, साईराज वॉरियर्स या संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेसंबंधी घेण्यात आलेला बैठकीत राहुल कलपत्री. अक्षय कुलकर्णी, राहुल पोटे, प्रदीप मुनवळी, अभिलाष कसोटी, रोहित फगरे, स्पर्धा सचिव विजय रेडेकर, अमरदीप पाटील, निलेश साळुंखे, साहिल मांगले, ओमकार, शुभम व विवेक आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.