For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फॅब चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

11:57 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
फॅब चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
Advertisement

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब लीग चषक 14 वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. सीआर सेव्हन स्पोर्ट्स एरेनाच्या टर्फ मैदानावरती आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे आनंद चव्हाण, अॅड. सागर खन्नूकर, संदीप खन्नूकर, गजानन जैनोजी व विजय रेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत आठ संघांना निमंत्रित करण्यात आले.यामध्ये सीएसआरएफ अकादमी, डीयुएफसी अकादमी, स्पोर्टींग प्लॅनेट, डिफेंडर खानापूर, मॅजिक स्पोर्टींग क्लब, एमएसडीएफ अकादमी, नम्म बेंगळूरु व तिरंगा आदी संघांचा सहभाग आहे.यावेळी ओमकार, अभय, हेमांशू गौर, श्रवण, अखिलेश, हरीष, ओ. एस. तेरणी, सुमीत, कौस्तुभ, मानस, योगेश व शुभम आदी उपस्थित होते. सदर लीग स्पर्धेत प्रत्येक संघ 7 सामने खेळणार असून गुणाच्या आधारे स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघ ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.