तुर्कियेत एफ-16 लढाऊ विमान कोसळले
तुर्कियेच्या वायुदलाचा वैमानिक ठार
वृत्तसंस्था/ अंकारा
तुर्कियेच्या बालिकेसिर प्रांतात तुर्कियेच्या वायुदलाचे एक एफ-16 लढाऊ विमान कोसळले आहे. उ•ाण केल्याच्या काही मिनिटातच या लढाऊ विमानाचा रेडिओ आणि रडारशी असलेला संपर्क तुटला होता. बालिकेसिरनजीक इस्तंबुल-इज्मिर महामार्गानजीक लढाऊ विमान कोसळले आणि याचे अवशेष दूरपर्यंत विखुरले गेले. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.
या विमान दुर्घटनेच्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही. तुर्कियेचे संरक्षण मंत्रालय आणि स्थानिक यंत्रणा याप्रकरणी तपास करत आहेत. घटनास्थळावरून अवशेष हस्तगत करण्यात आले आहेत. ही दुर्घटना तुर्कियेच्या वायुदलासाठी मोठा झटका आहे. एफ-16 तुर्कियेच्या हवाई शक्तीचा महत्त्वाचा हिस्सा अहे. तपास अहवाल समोर आल्यावर कारणे स्पष्ट होतील.
इफ-16 फायटिंग फाल्कन हे अमेरिकेचे प्रसिद्ध सिंगल-इंजिन सुपरसोनिक बहुउद्देशीय लढाऊ विमान असून याची निमिर्ती जनरल डायनॅमिक्सने केली आहे. तर आता लॉकहीड मार्टिनडकडून याची निर्मिती केली जात आहे. हे चौथ्या पिढीचे लढाऊ विमान असून ते आकाशातून आकाशा आणि आकाशातून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे.
एफ-16 दुर्घटनाग्रस्त होण्याची प्रमुख कारणे...
-इंजिन फेल्युयर
-वैमानिकाची चूक (स्पेशल डिसऑरिएंटेशन)
-हवामान
-मिड-एअर कोलिजन
-तांत्रिक बिघाड