For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्पतर्फे जांबोटी येथे नेत्र चिकित्सा शिबिर

10:41 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोककल्पतर्फे जांबोटी येथे नेत्र चिकित्सा शिबिर
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व डॉ. अगरवाल यांच्या नेत्रदर्शन आय हॉस्पिटलतर्फे जांबोटी येथे नेत्र चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी 70 हून अधिक जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये मोतिबिंदू, ग्लुकोमा तपासणीचा समावेश होता. लोककल्पचे स्वयंसेवक अनंत गावडे व सुहासिनी पेडणेकर यांनी रुग्णांची माहिती नोंदवून घेतली. कोणताही प्रवास किंवा खर्च न करता आपल्या डोळ्यांची तपासणी होईल, असे मला वाटले नव्हते. मात्र या शिबिरामुळे मला लाभ झाला, अशी प्रतिक्रिया जांबोटी येथील रमाबाई यांनी व्यक्त केली. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने लोककल्पने खानापूर तालुक्यातील एकूण 30 गावे दत्तक घेतली आहेत. त्यामध्ये जांबोटी गावाचाही समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.