For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची नेत्रतपासणी

11:57 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची नेत्रतपासणी
Advertisement

बेळगाव : जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, जिल्हा अंधत्व निवारण विभागाच्या संयुक्त विद्यमाने हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात दीडशेहून अधिक कैद्यांचे डोळे तपासण्यात आले. कारागृहाचे अधीक्षक बी. एम. कोट्रेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात जिल्हा अंधत्व निवारण अधिकारी डॉ. गीता कांबळे, मानसोपचारतज्ञ डॉ. अब्रार पुणेकर, डॉ. परशराम यनगन्नावर, डॉ. पांडुरंग पुजारी, जेलर राजेश धर्मट्टी, आर. बी. कांबळे, दंडयन्नावर, शशिकांत यादगुडे आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी डॉ. गीता कांबळे म्हणाल्या, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण डोळ्यांच्या विविध आजारांनी त्रस्त आहेत. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपचा अतिवापर याला कारण ठरत आहे. उशिरापर्यंत जागे राहून मोबाईलचा वापर करण्याचा प्रकार वाढत आहे. मोबाईल व  लॅपटॉपच्या अति वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कमीत कमी वेळेत गरजेपुरताच या साधनांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत कारागृहातील सर्व कैद्यांची नेत्रतपासणी करून त्यांना चष्मा देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.