डोऴे आलेत ? तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी हे करा आणि हे टाळा!
भारतात गेल्या महिनाभरात डोळ्यांच्या आजारात तसेच त्यामुळे होणारा दाह अशा प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यातील दमट हवामान जीवाणू आणि विषाणूंच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी अनुकूल वातावरण बनते. डोळ्यातून स्त्राव वाहणे हा डोळ्यांच्या संसर्गाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. याला 'पिंक आय' असेही म्हणतात. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह अत्यंत संसर्गजन्य असून त्यांची लक्षणे तीन ते चार दिवस टिकतात. डोळे लाल होणे, खाज सुटणे, डोळा दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांतून स्त्राव होणे, अंधुक दृष्टी, सूज आणि प्रकाश न सोसणे ही डोळ्यांच्या संसर्गाची काही सामान्य लक्षणे आहेत. तुम्हालाही डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह यासह किंवा डोळ्यांचा त्रास होत असल्यास काही टिपा लक्षात घ्या. जेणे करून त्यातून तुम्ही लवकर बरे होऊन आपले डोळे आरोग्यदायी बनण्यास मदत होईल.
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागावर होणारा दाह कमी करण्यासाठी पुढील काळजी घ्या
हे करा:
डोळ्यांची दाहकता कमी करण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेस किंवा डोळ्यावर थंडावा देणाऱ्या गोष्टींचा वापर करा जसे मेडीकल मधील कोल्ड कॉम्प्रेस, पाण्याची पट्टी.
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागावर दाह झाल्यामुळे तुम्हाला चिकटपणा किंवा स्त्राव जाणवू शकतो. हा स्त्राव काढून टाकण्यासाठी तसेच डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी उबदार आणि ओलसर कापड वापरा.
तुमच्या डॉक्टरांनी सल्ल्यानुसार आय ड्रॉप आणि औषधे वापरा.
अशा वेळी बाहेर पडू नका. शक्यतो गॉगलचा वापर करा.
या गोष्टी टाळा.
डोळ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी या गोष्टी करू नका :
डोळ्यांना दाह होत असेल तर डोळे चोळू नका तसेच डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.
या दरम्यान डोळ्यांवर करण्यात येणारा मेकअप शक्यतो टाळा
जाहीरात केलेले आय ड्रॉप्स वापरू नका; डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते घ्या.
डोळ्यांचा दाह होत असेल तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळा.
या दरम्यान पोहू नका किंवा डोळ्यात पाणी जाईल अशा गोष्टीपासून लांब रहा.
तुमच्या रोजच्या वापरातील वस्तू जसे कि टॉवेल, साबण दुसऱ्याला वापरू देऊ नका.
मोबाईल, टिव्ही, कॉम्प्युटर तसेच लॅपटॉपचा वापर टाळा.
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह ग्रस्त असताना आपले डोळे स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असल्याने डोळ्यांचा साथीमध्य़े डोळ्यांची स्वच्छता कशी करावी हे नक्की जाणून घ्या.
स्वच्छ कापड पाण्यात बुडवून काही मिनिटे बंद डोळ्यावर ठेवा.
यामुळे वाळलेला स्त्राव किंवा श्लेष्माला मऊ होऊन तो निघण्यास मदत होईल
स्वच्छ आणि फिल्टर केलेले उबदार कोमट पाणी घेऊन स्वच्छ कापडाने डोळे स्वच्छ करून घ्या.
डोळ्यांच्या आतील कोपरा आणि बाहेरील कोपऱा हळूवारपणे पुसून काढा
त्यानंतरव डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे डोळ्याचे थेंब वापरा.
या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही डोळ्यासाठी वेगवेगळे कापड वापरा.