गोल्याळी येथे लोककल्पतर्फे नेत्रतपासणी शिबिर
शिबिरात 50 हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी
बेळगाव : खानापूर तालुक्यातील गोल्याळी येथे लोककल्प फौंडेशनतर्फे नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल) यांच्या साहाय्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 50 हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून मोतिबिंदू निदान व इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. शिबिरासाठी नेत्रदर्शन हॉस्पिटलचे साहाय्यक व्यवस्थापक उदय कुमार, ऑप्टोमेट्रिस्ट राहुल मेदार व पुष्पक कलघटगी, आदित्य आलगुडेकर यांनी सेवा बजावली. लोककल्पचे अनंत गावडे आणि संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले व शिबिरादरम्यान गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. खानापूर तालुक्यातील दुर्गम व वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे. हा उपक्रम फौंडेशनतर्फे पुढील काळातही अशाच वैद्यकीय शिबिरांद्वारे व विविध उपक्रमांतर्गत नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणार असल्याचे सांगण्यात आले.