For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

लक्षवेधी विद्युत रोषणाई

06:45 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
लक्षवेधी विद्युत रोषणाई
Advertisement

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समादेव गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजार येथे बाजारपेठेत रंगबेरंगी विद्युत दिवे व दीपमाळा लावून करण्यात आलेली सजावट लक्षवेधी ठरत आहे.

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ विद्युतदिव्यांनी उजळून निघाली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. बेळगावसह गोवा व कोकणातील शेकडो नागरिक खरेदीसाठी बेळगावमध्ये दाखल होत असल्याने ही विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.

Advertisement

शहरातील समादेवी गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्ली आदी भागांमध्ये सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी दीपमाळा लावून सजावट करण्यात आली आहे. दिवाळी सणाला मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्यामुळे व्यापारीवर्ग आवर्जून वाट पाहतात. खरेदीदारांना आकर्षून घेण्यासाठी मागील काही वर्षांपासून विद्युत रोषणाई केली जात आहे.

दिवाळीमध्ये खरेदीचा ओघ वाढू दे व बाजारपेठेला चालना मिळू दे, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

Advertisement
Tags :

.