For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेस्लेच्या बेबी फूड्समध्ये ‘एक्स्ट्रा शुगर’

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेस्लेच्या बेबी फूड्समध्ये ‘एक्स्ट्रा शुगर’
Advertisement

भारत सरकारकडून चौकशीचे आदेश : बेबी फूड्समध्ये साखरेच्या वापरावर अनेक देशांमध्ये बंदी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

एफएमसीजी कंपनी नेस्लेकडून बेबी फूड्स उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर मिसळविण्यात येत असल्याचे वृत्त समोर आल्यावर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. झ्यूरिच येथील पब्लिक आय अँड इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्कने स्वत:च्या अहवालात नेस्ले भारतासह आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये विकण्यात येणारे लहान मुलांसाठीचे दूध आणि सेरेलेक यासारख्या फूड प्रॉडक्ट्समध्ये अतिरिक्त साखर आणि मध मिसळत असल्याचे नमूद आहे. तर बेबी फूड अत्यंत नियंत्रित श्रेणीत सामील असून आम्ही स्थानिक कायदे आणि आंतरराष्ट्रीय मापदंडांचे पालन करतो असे स्पष्टीकरण नेस्ले कंपनीने दिले आहे. नेस्लेच्या बेबी फूड्स प्रॉडक्ट्स प्रकरणाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) संबंधित अहवालातील आरोपांची चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. संबंधित अहवाल तज्ञांच्या पथकासमोर मांडला जाणार असल्याची माहिती एफएसएसएआयकडून देण्यात आली.

Advertisement

पब्लिक आय अँड इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्कच्या अहवालानुसार आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या 6 महिन्यांपर्यंतच्या बाळांसाठी गव्हाद्वारे निर्मित सर्व बेबी फूड्समध्ये दर बाउलमध्ये (एक सर्व्हिंग) सरासरी 4 ग्रॅम साखरेचे प्रमाण आढळून आले आहे. पब्लिक आयने या देशांमधील कंपनीच्या 150 उत्पादनांची तपासणी बेल्जियमच्या प्रयोगशाळेत केली होती. फिलिपाईन्समध्ये एक सर्व्हिंगमध्ये सर्वाधिक 7.3 ग्रॅम साखरेचे प्रमाण आढळले. तर नायजेरियात 6.8 ग्रॅम आणि सेनेगलमध्ये 5.9 ग्रॅम साखर बेबी फूड्समध्ये आढळले आहे. याचबरोबर 15 पैकी 7 देशांनी उत्पादनाच्या पातळीवर साखरेच्या dरमाणाविषयी माहितीच दिलेली नाही. नेस्लेच्या भारतातील सर्व बेबी सेरेलेक उत्पादनांच्या प्रत्येक एक सर्व्हिंगमध्ये सरासरी 3 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते. तर 6 महिन्यांपासून 24 महिन्यांपर्यंतच्या मुलांसाठी विकण्यात येणाऱ्या 100 ग्रॅम सेरेलेकमध्ये एकूण 24 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते. नेस्ले स्वत:च्या उत्पादनांमधील व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अन्य पोषक घटकांची माहिती जाहीर करते, परंतु साखर मिसळण्याबाबत कंपनी पारदर्शक नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशानुसार 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहारात कुठल्याही प्रकारची साखर किंवा गोडपदार्थाचा वापर केला जाऊ नये.

युरोपीय देशांबाबत वेगळे धोरण

नवजातांसाठी विकल्या जाणाऱ्या पावडर मिल्क नीडोमध्ये प्रति बाटली सरासरी 2 ग्रॅम साखरेचे प्रमाण होते. दुसरीकडे नेस्ले स्वत:चा देश स्वीत्झर्लंड किंवा जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्स यासारख्या युरोपीय देशांमध्ये विण्यात येणाऱ्या याच उत्पादनांमध्ये साखरेचे अस्तित्व नव्हते.

Advertisement
Tags :

.