For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने समर्थनगरमधील महिलेकडून गंडा

04:34 PM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने समर्थनगरमधील महिलेकडून गंडा
Advertisement

50 हून अधिक महिलांकडून उकळले पैसे

Advertisement

बेळगाव : बँकेतून प्रत्येकी 10 लाख रुपये कर्ज मिळवून देण्याचे सांगून अनेक महिलांकडून पैसे उचलून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार देण्यासाठी शुक्रवारी मार्केट पोलीस स्थानकात गर्दी जमली होती. समर्थनगर येथील एका महिलेने 50 हून अधिक बेरोजगार महिलांकडून प्रत्येकी 20 हजार रुपये उचलले आहेत. बँकेतून तुम्हाला 10 लाख रुपये कर्ज मिळवून देऊ, यामध्ये 5 लाखांची सबसिडीही मिळवून देऊ, असे सांगत समर्थनगर येथील महिलेने अनेकांकडून रक्कम गोळा केली आहे. बँकेतून कर्ज तर नाहीच. आपण दिलेले पैसेही परत मिळत नाहीत, हे लक्षात आल्यामुळे संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महिला शुक्रवारी मार्केट पोलीस स्थानकात पोहोचल्या. मात्र, हा संपूर्ण प्रकार लोंढा परिसरात घडल्यामुळे स्थानिक पोलीस स्थानकात फिर्याद देण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. समर्थनगर येथील भाग्यश्री या महिलेबरोबरच एका बँकेच्या कॅशियरविरुद्धही आरोप करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.