विदेश सचिव मिसरींच्या कार्यकाळात वाढ
कार्मिक मंत्रालयाने जारी केला आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने विदेश सचिव विक्रम मिसरी यांचा कार्यकाळ 14 जुलै 2026 पर्यंत वाढविला आहे. कार्मिक मंत्रालयाने एक आदेश जारी करत याची माहिती दिली आहे. विक्रम मिसरी हे 1989 च्या तुकडीचे आयएफएस अधिकारी असून 15 जुलै रोजी त्यांनी विदेश सचिवाचा पदभार स्वीकारला होता.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मिसरी यांना निवृत्तीनंतरही सेवाविस्तार देण्याचा निर्णय घेतला आहे. विदेश सचिवाच्या स्वरुपात मिसरी यांचा कार्यक्रम 30 नोव्हेंबर रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून 14 जुलै 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत वाढविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली आहे.
विक्रम मिसरी यांनी स्वत:च्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. म्यानमार, स्पेन आणि चीनमध्ये ते भारताचे राजदूत राहिले आहेत. याचबरोबर त्यांनी इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणूनही कार्य केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात ते उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चीनसोबतच्या गलवान खोऱ्यातील तणाव दूर करण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.