For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

परीक्षा सुधारणा समितीच्या कार्यकाळात वाढ

06:20 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
परीक्षा सुधारणा समितीच्या कार्यकाळात वाढ
Advertisement

जानेवारी 2027 पर्यंत अहवाल सादर करणार : नंदन नीलेकणी समितीचे अध्यक्ष

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नीट परीक्षेतील अनियमितता आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांच्या पार्श्वभूमीवर नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षा सुधारणा समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. ही समिती आता जानेवारी 2027 पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे.

Advertisement

परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवणे, प्रŽपत्रिका सुरक्षित ठेवणे आणि परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे, ही या समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या आरोपांनंतर देशभरात परीक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

परीक्षा व्यवस्थेत कोणत्या सुधारणा होणार?

समितीकडून परीक्षा प्रक्रियेतील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींचा अभ्यास केला जाणार आहे. परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, प्रश्नपत्रिकांचे वितरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर समिती विचार करणार आहे. समितीच्या शिफारशींमुळे भविष्यात नीटसह देशातील विविध प्रवेश परीक्षांच्या आयोजनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याने परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी अधिक वेळ मिळणार आहे. जानेवारी 2027 पर्यंत सादर होणाऱ्या अहवालातील शिफारशींवर केंद्र सरकार पुढील निर्णय घेण्याची शक्मयता आहे

Advertisement
Tags :

.