For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थी बसपास कालावधीत वाढ

10:49 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थी बसपास कालावधीत वाढ
Advertisement

10 एप्रिलपर्यंत करता येणार मोफत बसप्रवास

Advertisement

बेंगळूर : परीक्षा व इतर प्रसंगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकरिता अनुकूल व्हावे, यासाठी राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देते. याच आधारावर विद्यार्थ्यांच्या बसपास कालावधीत 10 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पहिली ते नववी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ग 10 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या बसपासची मुदत 31 मार्च रोजी संपली आहे. एप्रिलमध्येही काही विषयांचे पेपर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसपास मुदत वाढविण्याची मागणी झाली होती. याची दखल घेत केएसआरटीसीने 10 एप्रिलपर्यंत बसपासची मुदत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थी सध्या वापरत असलेला बसपास दाखवून राज्य परिवहनच्या बसेसमधून प्रवास करू शकतील.

Advertisement
Advertisement
Tags :

.