For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एच-वन बी व्हिसा फीला कालावधीवाढ

06:39 AM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
एच वन बी व्हिसा फीला कालावधीवाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

Advertisement

अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एच वन बी व्हिसाच्या वाढीव शुल्काला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा कालावधीवाढ दिली आहे. आधी त्यांनी या व्हिसाचे शुल्क 1 लाख डॉलर्सनी वाढविले होते. हे वाढीव शुल्क कंपन्यांनी भरावयाचे होते. आता या वाढीव शुल्काला त्यांनी 2027 या वर्षासाठीही कालावधीवाढ दिली आहे. त्यामुळे अमेरिकेत जाऊन या व्हिसाच्या आधारे नोकरी किंवा व्यवसाय करणे आणखी कठीण होणार आहे. मात्र, या वाढीव शुल्कातून मुक्ती मिळवण्याची संधी खुली ठेवण्यात आली आहे. ज्या तंत्रज्ञांना अमेरिकेचा गृहसंरक्षण विभाग मान्यता देईल. त्या कर्मचाऱ्यांसाठी हे शुल्क कंपन्यांना भरावे लागणार नाही. त्यामुळे अमेरिकेत जाऊन काम करण्याचा मार्ग पूर्णत: बंद झाला आहे, असे नाही, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Advertisement

.