भक्तीच्या खुनातील संशयितांच्या कोठडीत वाढ
रत्नागिरी :
शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकरच्या खून प्रकरणातील तिघा संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आह़े सोमवारी शहर पोलिसांकडून संशयितांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होत़े यावेळी न्यायालयाने तिघांना 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल़ी तर राकेश जंगम याच्या खूनातील संशयित नीलेश भिंगर्डे याला जयगड पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आह़े
भक्ती मयेकर हिच्या खूनप्रकरणी तिचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (25, वाटद खंडाळा रत्नागिरी), विश्वास विजय पवार (41, ऱा कळझोंडी रत्नागिरी) व सुशांत शांताराम नरळकर (40, ऱा आदर्शनगर वाटद खंडाळा) या तिघांना न्यायालयाने याअगोदर 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होत़ी त्यानुसार शहर पोलिसांकडून तिघा संशयितांना सोमवारी पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े आरोपी यांनी गंभीर गुन्हा केला असून पुढील तपास कामासाठी आणखी पोलेस कोठडी द्यावी, अशी मागणी शहर पोलिसांकडून न्यायालयापुढे करण्यात आल़ी यावेळी न्यायालयाने तिघा संशयितांना 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल़ी
त्याचप्रमाणे दुर्वास पाटील, विश्वास पवार या दोघांनी 6 जून 2024 रोजी नीलेश भिंगर्डे याच्या मदतीने राकेश जंगम याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होत़ी त्यानुसार जयगड पोलिसांनी सांगली येथून नीलेश भिंगर्डे याला अटक केली होत़ी नीलेश याचीदेखील पोलीस कोठडी 8 सप्टेंबर रोजी संपल्याने पोलिसांकडून त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल़ी दुर्वास पाटील व विश्वास पवार या दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांनहा राकेश जंगम खून प्रकरणात जयगड पोलिसांकडून त्यांना अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.