For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एसआयआर’ला दुसऱ्यांदा मुदतवाढ

06:13 AM Aug 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘एसआयआर’ला दुसऱ्यांदा मुदतवाढ
Advertisement

अर्ज सादर करण्यास 17 ऑगस्टपर्यंत मुदत : केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश् 

Advertisement

 त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर : मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेशी (एसआयआर) संबंधित अर्ज भरणा केलेले अर्ज सादर करण्याचा कालावधी 17 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी यासंबंधी आदेश जारी केला आहे. राज्यात एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी झाल्यानंतर दुसऱ्यांदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी एसआयआरसाठी 29 जुलैपर्यंत असणारी मुदत 8 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Advertisement

राज्यातील 5.54 कोटी मतदारांपैकी 1.11 कोटी मतदार ‘एएसडीडीओ’ (बेपत्ता, कायम स्थलांतरित, मृत, बोगस किंवा दुबार नोंदणी व इतर) यादीत समाविष्ट झाले आहेत. राज्यातील लोकसंख्येच्या 20 टक्के मतदार एसआयआरच्या व्याप्तीबाहेर आहेत. यात बेंगळुरातील सर्वाधिक 49 लाखांहून अधिक मतदार आहेत.

दरम्यान, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अन्बुकुमार यांनी एसआयआर अर्जांचे डिजिटलायझेशन आणि अधिक संख्येने पात्र मतदारांची नावे मसुदा यादीत नोंदणी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. याच्या आधारे आयोगाचे अप्पर सचिव संदीपकुमार यांनी एसआयआरचे अर्ज स्वीकार आणि भरणा करून परत करण्याची प्रक्रिया 17 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. 24 ऑक्टोबर रोजी मसुदा मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल तर 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत मतदारांकडून आक्षेप नोंदवून घेतले जातील. आक्षेपांवर 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

एसआयआर : नावे एएसडीडीओ यादीत आहेत का?

राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत (एसआयआर) काही मतदारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून देखील त्यांची नावे ‘एएसडीडीओ’ (अनुपस्थित, कायम स्थलांतरित, मृत, बोगस आणि इतर) यादीत आली आहेत. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अन्बुकुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

````` एएसडीडीओ यादीन नाव समाविष्ट झाला याचा अर्थ मतदाराचा मतदानाचा हक्क रद्द झाला असा होत नाही. त्याऐवजी अशा मतदारांचे पडताळणी होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आम्ही विधानसभा मतदारसंघनिहाय आणि बूथनिहाय एएसडीडीओ यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे एसआयआर अर्ज भरणा करून स्वीकृती पत्र मिळवून देखील नाव एएसडीडीओ यादीत आढळल्यास तत्काळ बीएलआंsशी संपर्क साधून ‘रोलबॅक’ करावे.

निवडणूक आयोगाची वेबसाईट किंवा बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत नाव एएसडीडीओ यादीत आहे का, याची तपासणी करावी. नाव कोणत्या कारणास्तव  एएसडीडीओ यादीत आले आहे, याचे कारण जाणून घ्या, नंतर आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अर्ज योग्य माहितीसह बीएलओ किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करा. बीएलओ अॅपमध्ये संबंधित अधिकाऱ्याला एएसडीडीओ यादीतून अर्ज डिजिटलायझेशन यादीत रोलबॅक करतील.

मतदार दुसऱ्या मतदारसंघात कायमस्वरुपी स्थलांतरित झाला असेल तर फॉर्म-6 सादर करून किंवा एसआयआर अंतर्गत लागू असलेल्या प्रक्रियेद्वारे नवीन पत्त्यावर मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करू शकतो. अर्ज भरल्यानंतर मिळणारे स्वीकृतीपत्र आणि नाव एएसडीडीओ यादीत नसेल तरच एसआयर प्रक्रिया यशस्वी मानली जाईल, असे निवडणूक अधिकारी अन्बुकुमार यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.