For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसकडून प्रमोद कृष्णम यांची हकालपट्टी

06:38 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसकडून प्रमोद कृष्णम यांची हकालपट्टी
Advertisement

राम अन् राष्ट्रासंबंधी तडजोड नाही : कृष्णम

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसने उत्तरप्रदेशातील मोठे नेते आणि कल्कि धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी एक वक्तव्य जारी करत याची माहिती दिली आहे. शिस्तभंग आणि वारंवार पक्षाच्या विरोधात वक्तव्ये केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रमोद कृष्णम यांची तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्याच्या उत्तरप्रदेश काँग्रेस समितीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचे  वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.

Advertisement

राम आणि राष्ट्रासंबंधी तडजोड केली जाऊ शकत नसल्याचे प्रमोद कृष्णम यांनी पक्षाकडून झालेल्या कारवाईनंतर म्हटले आहे.  प्रमोद कृष्णम यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे त्यांनी कौतुक केले होते. प्रमोद कृष्णम हे काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. तसेच ते प्रियांका वड्रा यांचे राजकीय सल्लागार देखील होते.

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 2 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. तसेच 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कल्कि धामच्या शिलान्यास कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेत त्यांनाही निमंत्रित केले होते. भगवान राम सर्वांचे आहेत, मी भगवान रामाचा आहे, कल्कि धाममधील सोहळ्याचे निमंत्रण राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही दिले आहे, आता यावे की नको याचा निर्णय त्यांचा असेल असे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले होते. राम मंदिर उभारणीला पाठिंबा दर्शविणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रमोद कृष्णम यांचे नाव आघाडीवर होते.

Advertisement
Tags :

.